
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : एकीकडे महाराष्ट्रात मास्क सक्तीचा नियम हटवला आहे. तर दुसरीकडे राज्यातली कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांचं काय होणार? निर्बंध पुन्हा लागणार की आत्ता आहेत तेच कायम राहणार? असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत. याबद्दलच उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी भाष्य केलं आहे.
पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सह उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले की, कोरोनाचे रूग्ण सध्या वाढत आहेत. परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे. डब्ल्यू एच ओ आणि केंद्रीय आरोग्याचा अहवाल आणि तशा सूचना आल्यास राज्यात पुन्हा कोरोनाच्या निर्बंध लागू करण्याशिवाय पर्याय नाही.