
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख मा.श्री.नितीन शिंदे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील गरजु अपंग व्यक्तींना सायकलचे वाटप त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले. नितीन (दादा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांन साठी एसटी स्मार्ट कार्ड व आरोग्य शिबिर राबवले होते. असे नेहमीच इंदापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
पण यावेळी इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख यांनी अपंगांना सायकल वाटप करून खरच एक आदर्श निर्माण केला आहे.ज्यावेळी नितीन (दादा) शिंदे यासाठी अपंगांच्या घरी जाऊन सायकलचे वाटप करत असताना अपंगांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू हे सर्व काही सांगून जात होते, सायकली दिल्याबद्दल अपंग व्यक्तींनी नितीन (दादा) शिंदे यांचे खूप खूप आभार मानले.
यावेळी निवृत्ती आबा शिंदे, हेमचंद्र शिंदे, हनुमंत शिंदे, हरिभाऊ पुंडे, बाळासाहेब नलावडे, काशिनाथ शिंदे, दशरथ शिंदे ,महेश आरडे, नामदेव शिंदे,सुर्यकांत चव्हाण , सोपान शिंदे,शंकर नरबट, शिवाजी साठे, श्रेयस नलवडे ,वसंत गुरव, अजिनाथ शिंदे,उत्तम भोंगळे, रामभाऊ बोडरे, रावसाहेब शिंदे, अमोल शिंदे , बाबा चव्हाण,भरत शिंदे, शामराव चव्हाण, संजय कानगुडे,लाला चव्हाण, वैभव शिंदे, सोमनाथ सावंत, स्वप्निल शिंदे,विशाल शिंदे, भैय्या मुलाणी व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.