
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
ता.कोरेगांव करंजखोप मध्ये सालाबाद प्रमाणे तपोनिदी संतपुरीगोसावी महाराज संजीवन सोहळा उत्साहांत संपन्न झाला. यावेळी परमपूज्य ओंकार गिरी महाराज गोखळीकर महाराज यांच्या हस्ते संत पुरीगोसावी समाधी महाभिषेक व मंत्र पुष्पांजली सर्व गोसावी समाजांतील बांधवांच्या उपस्थितीत व करंजखोप ग्रामस्थ गावांतील माता बहिणी आमच्या पुरीगोसावी कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती ह.भ.प तृप्ती महामुनी (महामुनी) मा.लालासो नेवसे( सरपंच)मा. धनंजय धुमाळ बापू ( ग्रामपंचायत सदस्य) मा .किशोर गिरीगोसावी (वाठार पोलीस स्टेशन कर्मचारी) आदीं ग्रामस्थांच्या उपस्थितीत व गोसावी समाजांतील सर्व पै. पाहुवणे या कार्यक्रमांसाठी उपस्थिंत होते. यावेळी पुरीगोसावी परिवाराकडूंन महाप्रसांदाचे आयोजन करण्यांत आले होते. यावर्षीचे महाप्रसादांचे मानकरी आमचे मोठे बंधू मा. निवास दत्तात्रेय पुरीगोसावी यांनी महाप्रसादांचे नियोजन केले होते. यावेळी निवास पुरीगोसावी व त्यांच्या पत्नी सौ.भाग्यश्री पुरीगोसावी यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल,श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले. यावेळी संपूर्ण पुरीगोसावी कुटुंबातील सर्व भाऊ कुटुंब प्रमुख मा. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी व हिराबाई गिरीगोसावी (आत्या )या सर्वांच्या उपस्थिंतीत संत पुरीगोसावी महाराज संजीवन समाधी महाभिषेक सोहळा संपन्न झाला.