
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी दहिवडी-संभाजी गोसावी
ता.माण कासारवाडी येथील नटराज पांडुरंग सस्ते या युवकांने मटण खायला का घालत नाही? म्हणून डील पांडुरंग बाबुराव सस्ते यांचा शेतात पाटलाकडून कुर्हाडीने खून केल्यांची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्यांच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून नटराज सस्ते हा युवक मटणासांठी वारंवार वडिलांशी हुज्जत घालायला वडील त्याला नेहमी समजवायचे आपली परिस्थिती बेताची आहे. मटण खूप महाग असल्यांमुळे ते नेहमी आपल्याला आणून खायला परवडणार नाही तरीदेखील वडिलांना धमकी द्यायचा कुठूनही पैसे अणा,आणि मला मटण खाण्यासांठी घेऊन या नाहीतर मी तुम्हांला जीवे मारीन. तरीदेखील वडीलांनी परस्थिती नसतानाही त्याला मटण आणून द्यायचे व त्याला त्याची चांगली चटक लागली होती त्यामुळे त्याला मटन खायला मिळाले नाही की? तो वेड्यासारखा करायचा आणि वडिलांच्या अंगावर धावून जायचा. शुक्रवारी सायंकाळी वाडिलांना मटण यासांठी त्याने आग्रह धरला,पण वडिलांनी पैसे जवळ नसल्याने मटण आणण्यांचे टाळले त्यामुळे तो चिडून जाऊन वडिलांचा पाठलाग करून मारहाण करीत कुर्हाडीने या माथेफिरुने वडिलांचा खून केला. सदर घटनेची तक्रार पत्नी चतुराबाई पांडुरंग सस्ते हिने दहिवडी पोलिसांत दिली. आरोपी नटराज पांडुरंग सस्ते याला पोलिसांनी ताब्यांत घेऊन अटक केली. सदरची कामगिरी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखांली डी .जी तुपे अधिक तपास करीत आहेत.