
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-श्री क्षेत्र गाणगापूर येथे अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन 7 मे 2022 ते 13 मे 2022 दरम्यान करण्यात आले असून दिवसभर दत्तनामाचा गजर सुरू राहणार आहे. सायंकाळी 5 ते 6 आनंद पाठ भजन सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत महापूजा व भजन व 13 मे रोजी तांदुळाची आनंद दत्त महापूजा होणार असून या महापूजेचे मुख्य आचार्य श्री संत नामदेवगिरी गुरु बाळगीर महाराज माहूर गडाचे आचार्य असतील .
या कार्यक्रमात श्री संत नारायणगिरी महाराज ,श्री आनंदपुरी महाराज ,संत केशवगिरी महाराज ,संत ज्ञानभरती महाराज ,संत रतनपुरी महाराज , संत निर्गुणपुरी महाराज , संत मच्छिंद्रपुरी महाराज,रावसाहेब महाराज धनेगावकर हे उपस्थित राहणार आहेत 14 मे रोजी काकड आरतीने या कार्यक्रमाची सांगता होईल..
तरी या सप्ताहाचा भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती श्री गुरु श्यामगिरी महाराज मठ संस्थान हरबळ-नंदनवन यांच्यावतीने करण्यात आली