
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी एकनाथ गाडीवान.
देगलूर – (2 मे 2022) प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत देगलूर ते बिदर राज्य महामार्गा वरुन जाणा-या मरखेल झरी फाटा ते झरी पेंडपल्ली शिवणी देवापूर ते येरगी तडगूर तेलंगणा सिमेला जोडणा-या लांबी 12 कि.मी रक्कम रू. 821.37 लक्ष रुपये रस्त्याचे भूमिपूजन लोकनेते मा.खा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी आ.सुभाषरावजी साबणे संयोजक प्रदेश दिव्यांग आघाडी महाराष्ट्र रामदास पाटील सुमठाणकर जिल्हा सरचिटणीस गंगाधरराव जोशी लक्ष्मणराव ठक्करवाड श्रावण पाटील भिलवंडे माजी सभापती प स बिलोली अशोक पाटील मुगावकर कार्यकारी अभियंता निला साहेब कंत्राटदार सिद्दिकी औरंगाबादकर कृउबा समिती सभापती अनिकेत पाटील राजूरकर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर शिवराज पाटील माळेगावकर जिल्हा चिटणीस शिवकुमार देवाडे अशोकराव साखरे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे शहर अध्यक्ष अशोक गंदपवार चेअरमन नरसिंग पाटील वळगकर नगरसेवक प्रशांत दासरवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबुराव पाटील खुतमापूरकर अनिल पाटील खानापूरकर शांताराम पाटील वझरकर पंकज देशमुख करडखेडकर गंगाधरराव भुताळे झरीकर रवि पंदिलवार पंचायत समिती सदस्य मधुकररेड्डी दंडेवार विठ्ठलराव तालीमकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रल्हादराव उमाटे जुकल जि.प सदस्य माधवराव देशाई घुळेकर हभप हणमंत महाराज कनंठाळीकर माजी सभापती प स मुखेड व्यंकटराव पाटील बेन्नाळकर सरपंच प्रकाश कुंडगीरे रावणकोळा सरपंच संतोष पाटील येरगीकर वैद्यकीय आघाडी डॉ.प्रकाश पाटील धिरज पाटील झरीकर परिसरातील सरपंच उप सरपंच सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सदस्य ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठा वरुन मा.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हे काम गोजेगावकर साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झाले असे सांगून यापुढे या भागातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे अश्वाशित केले व देगलूर मरखेल औराद रोड नॅशनल हायवेचा दर्जा मंजूर करुन घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेबांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून या भागातील समस्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडविण्यासाठी प्रयत्न करीन असे आवाहन केले.
या भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन
बबन पाटील गोजेगावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वर हांडे तर आभार प्रदर्शन सुरेश जाधव ठाणेकर यांनी केले
या उद्घाटन सोहळ्याला या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.