
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
- युवकांचा मृतदेह तब्बल दोन तास तहसील कार्यालयात , नातेवाईकांनी केला तहसील व पोलिस प्रशासनाचा निषेध
लोहा -कंधार रस्त्यावर अवैध वाळू ची वाहातूक करणाऱ्या हायवा टिप्परच्या ड्रायव्हर ने भऱधाव वेगात निष्काळजीपणाने गाडी चालवून बसवराज उर्फ ओम सोनवळे या १८ वर्षीय युवकाला जोरदार धडक मारुन गंभीर जखमी केल्यामुळे नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
लोहा -कंधार रोडवर सकाळी मार्निंग वाकला जात असताना अचानक मागुन अज्ञात अवैध वाळू ची वाहातूक करणाऱ्या हायवा गाडीने जिल्हा परिषद शिक्षक शिवराज सोनवळे यांचे चिरंजीव बसवराज उर्फ ओम सोनवळे यास भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या टिपर ने उडविले त्यात बसवराज उर्फओम सोनवळे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी नांदेड येथील यशोसाई हास्पिटलमध्ये हलविण्यात आले परंतु उपचार चालू असताना अचानक आज दि. ४ मे पहाटे त्यांचें दुःखद निधन झाले हि घटना कळताच लोहा शहर व परीसरात हळवळ होत आहे.
लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया नी थैमान घातले असून त्यांवर कोणाचे लक्ष नाही तहसीलदारांनी व महसूल प्रशासनान फक्त बघ्याची भुमीका घेत असुन त्यावर कोणाचेही अंकुश नाही असे जनतेतून बोलले जात आहे.
टिप्पर चा तपास लागावा त्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईकांनी मृतदेह तहसील मध्ये आणले होते पण तहसीलदार कार्यालयात अद्यापही उपस्थित नव्हते त्यांची वाट पहात जवळपास तीन तास वाट पहावी लागली. लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे हे कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाही मुख्यालयी राहत नसल्याने लोहा तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहातूक मोठ्या प्रमाणात होत आहे पण यात १८ वर्षीय ओम सोनवळे या युवकांचा निष्पाप जीव गेला.
दि.३० एप्रिल रोजी अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परने बसवराज उर्फ ओम सोनवळे यांना उडविले व आज दि. ४ रोजी त्यांची उपचारा दरम्यान प्राण ज्योत मावळली. बसवराज उर्फ ओम सोनवळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी त्याची डेटबाॅडी लोहा तहसील कार्यालयात आणली व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या अवैध वाळू च्या हायवा टिपर चालकास तात्काळ अटक करावे अशी मागणी केली.
यावेळी लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच विना क्रमांकाच्या टिपर चालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओला पत्र देण्यात येणार आहे असे सांगितले.
त्यानंतर बसवराज उर्फ ओम सोनवळे यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला .
यावेळी नगरसेवक दत्ता वाले, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, दत्ता शेटे यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सदरील घटनेमुळे महसूल प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे व लोहा तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहातूकीवर शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.