
दैनिक चालु वार्ता मोलगी प्रतिनीधी-आपसिंग पाडवी
4 धडगाव तालुक्यातील कुंडल येथील रहिवासी ललिता मोतीराम पाडवी वय२८ वर्षे रा.कुंडलचा गुगलमालपाडा या युवतीचा धडगाव शहराहुन पाच किलोमीटर अंतरावरील हरणखुरी ते सोमाणा रस्त्यावर एका मोरीवजा पुलाच्या खाली मोकळ्या जागेत अज्ञातस्थळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर युवती शिरपूर येथे कंपनीत कामानिमित्त गेली होती. तीन दिवसापूर्वी घरी येत असल्याची फोन द्वारे आई-वडिलांना माहिती दिली होती. मात्र सदर युवती घरी पोहोचलीच नाही. त्यामुळे आई-वडिलांनी शोध सुरू केला होता. काल रात्री उशिरा सदर युवतीचा मृतदेह जवळील गावकऱ्यांना आढळून आल्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी व धडगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर धडगाव पोलीस घटना स्टेशन ला मृत मुलीचे वडील मोतीराम सत्या पाडवी यांच्या फिर्यादी वरून धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर भा.द.वी कलम 174 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून मयताचे कारण अज्ञात कारणाने दाखवण्यात आले आहे.सदर खून दोन दिवसांपूर्वीच झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत तसेच उन्हामुळे संपूर्ण शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नेमकं काय प्रकार घडला आहे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पो.स ई डी.के.महाजन व
पो.ना.११५५ दीपक वारुळे करीत आहेत.