
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :दि.४ .नांदुरा येथून जळगांव जामोद कडे जाणाऱ्या रेल्वे गेट वरील उड्डाण पुलाचे उद्घाटन होऊन आठ वर्षे होऊन गेली.ह्या रखडलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम लवकर सुरु करण्यासाठी आज दि ५ मे पासून
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना दिलेल्या लेखी निवेदनात दि.४ मे पर्यंत उड्डाण पुलाचे बांधकामास सुरवात न झाल्यास दि .५ मे पासून धरणे करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.त्यानुसार हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावरील काही गेटवर उड्डाण पूल, भुयारी मार्ग आतापर्यंत कार्यान्वित झाले आहेत.ह्या उड्डाण पुलाचे बांधकाम का रखडलेले आहे हे एक कोडेच आहे. ह्या रेल्वे गेटमुळे शेतकरी, व्यापारी,प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी ह्यांना दररोज नाहक त्रास सहन करावे लागत असुन आतापर्यंत लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत.ह्यातुन लोकांची सुटका करण्यासाठी व रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी रेल्वे गेट नांदुरा जवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन करण्यात येणार. सर्व पक्षभेद बाजूला ठेवून ह्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे. ह्या धरणे आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अनिल गायकवाड, कॉम्रेड रामेश्वर काळे,कॉम्रेड विजय पोहनकर, कॉम्रेड जितेंद्र चोपडे, जेष्ट नेते कॉम्रेड दादा रायपुरे एस. एफ.आय चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सागर पतांडे,संग्रामपूर तालुका अध्यक्ष कॉम्रेड शेख अकबर इत्यादी सहभागी होणार आहेत.