
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी – किशोर वाकोडे
नांदुरा :-दि.४. तालुक्यातील ग्राम कंडारी येथील बाळकृष्ण वासुदेव पाटील यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिनांक 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान दरवर्षी राज्य शासनातर्फे केला जातो सन 2017 साला साठी दिला जाणारा कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्री बाळकृष्ण पाटील यांना देण्यात आला यावेळी बाळकृष्ण पाटील व सौ आशाताई पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच नाशिक येथे संपन्न झाला यावेळी राज्यपाल व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ कृषिमंत्री दादाजी भुसे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे. ना. विश्वजीत कदम. ना. आदिती तटकरे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले कृषी आयुक्त धीरजकुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते श्री बाळकृष्ण पाटील यांनी शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी चाळीस वर्षात कृषी पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये शेती पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग केला. त्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार केला असून त्यांचा लाभ नांदुरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना झालेला आहे. फळबाग लागवड पशुसंवर्धन सूक्ष्म सिंचन उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत झालेले आहे. श्री बाळकृष्ण पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे श्री बाळकृष्ण पाटील यांनी गेल्या चाळीस वर्षांमध्ये शेतीमध्ये अनेक प्रयोग करून उच्चांकी पीक उत्पादना साठी सतत प्रयत्न केले आहे अनेक प्रसंगी शेतकऱ्यांना त्यांच्या अनुभवातुन मार्गदर्शन केलेले आहे. अनेक शेतकरी हिताचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. यापूर्वी त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुसद यांचेकडून 18 ऑगस्ट 2007 ला वसंतराव नाईक स्मृती पुरस्का.र सन दोन हजार सोळा मधे जिल्हा परिषद बुलढाणा प्रगतिशील शेतकरी पुरस्कार. सन 2017 साली आदर्श शेतकरी व 2018 मध्ये महाअॅग्रो शेतकरी सन्मान इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .
श्री बाळकृष्ण वासुदेव पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभाग वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.या वेळी बोलताना बाळकृष्ण पाटील यांनी हा पुरस्कार केवळ माझा नसून राज्य कृषी विभाग, जिल्हा कृषी विभाग, तसेच तालुका कृषी विभाग माझे कुटुंबीय, कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ माझे हितचिंतक या सर्वांचा आहे.असे प्रतिपादन केले.हा पुरस्कार मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.