
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे-विशाल खुणे
या स्पर्धेचे दिनांक 30 एप्रिल व 01 मे 2022 रोजी. आनंद मंगल कार्यालय धानोरी या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 2000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे आयोजक: अमितकुमार ठाकुर (संस्थापक शोतोकान कराटे ड्यू स्पोर्टस असोसिएशन पुणे)मा. अक्षय सरोदे सर, मा. सागर लोखंडे सर व तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी स्पर्धकांसाठी बक्षीस रुपी इलेक्ट्रिक बाइक, ट्रॉफी, रोख बक्षीस, व बेस्ट सपोर्टिंग पालक हा विशेष सन्मान ठेवण्यात आला होता. स्पर्धेनिमित्त परिसरातील राजकीय सामाजिक उद्योग व तिरसाट सिनेमा अभिनेता व अभिनेत्री व फेम मी नादखुळा अभिनेते सर्व मान्यवर स्पर्धेला उपस्थित होते. आयोजकांनी सर्व स्पर्धक पालक कोच या सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले.