
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्याचे लाडके नेतृत्व व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माध्यमातून शेटफळ हवेली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
या कामांमध्ये प्रामुख्याने शेटफळ हवेली ते सुरवड भांडगाव रोड 7 कोटी रुपये, शेटफळ हवेली ते नीरा भीमा कारखाना रोड 6 कोटी रुपये,शेटफळ हवेली ते भोंगळे वस्ती रोड 15 लक्ष रुपये, शेटफळ हवेली गावाअंतर्गत कॉंक्रिटीकरण व खडीकरण रस्ते,सामाजिक सभागृह, बंदिस्त गटार योजना व इतर कामे 85 लाख रुपये या सर्व कामांचे उद्घाटन शुक्रवारी शेटफळ हवेली येथे होणार असल्याचे शेटफळ हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शेटफळ हवेली गावाला याअगोदर कधीच येवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही परंतु शेटफळ हवेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मामांकडे या कांमाचा पाठपुरावा करून हा निधी मिळवला आहे.अजुन पुढील काळात याहून मोठ्या प्रमाणात निधी मामांनकडुन मिळविला जाईल असे शेटफळ हवेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सांगितले.
दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा जाहीर कार्यक्रमास शेटफळ हवेली येथे येत असल्याने ते काय बोलणार या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण भैय्या माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा छायाताई पडसळकर,या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत शेटफळ हवेली, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.