दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालणा (मंठा )
बेलोरा येथील शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले असताना तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांनी “एफ.आर. फाडू का? तुमच्या वेळेनुसार कार्यालय चालवायचं का?” अशा उर्मट शब्दांत वयोवृद्ध शेतकऱ्यांनाच दमदाटी केली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष न देता अशा अपमानास्पद वर्तनामुळे कृषी विभागाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.
विभागावर शंका – शेतकऱ्यांचा सवाल
कृषी विभाग हे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरायला हवे, पण तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे “हा विभाग शेतकऱ्यांचा आहे की दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा?” असा सवाल उपस्थित झाला आहे.
विश्वास हरवला – नामुष्की वाढली
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाऐवजी दमदाटी
भ्रष्टाचाराच्या तक्रारी ऐकण्याऐवजी दडपशाही
व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हाभर चर्चा
या सर्व घडामोडींमुळे कृषी विभागाची प्रतिमा मलिन झाली असून, शेतकऱ्यांचा विश्वास कोसळला आहे.
शेतकऱ्यांची मागणी
दमदाटी करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी बेलोरा फळबाग भ्रष्टाचार प्रकरणासाठी
जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमावी
शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत
वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी
सरकार शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या योजना जाहीर करतं. पण तालुका स्तरावर अधिकारी भ्रष्टाचाराची चौकशी करण्या ऐवजी पाठीशी घालुन मनमानी करत असतील, तर त्या योजना कागदावरच राहणार.
चौकशीही कागदार राहणार
अशा वेळी विभागीय अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी ठरते – “अधिकाऱ्याला वाचवणं की शेतकऱ्यांचा विश्वास वाचवणं?”
शेतकऱ्यांचा शेवटचा इशारा
(शेतकऱ्यांना गप्प बसवणं शक्य नाही.रोजगार सेवक व कृषी साह्यकांनी संनगनमत करून गोर गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपये हडप केले आहे याची सखोल चोकशी करून कारवाई करावी नसता इतिहास साक्षी आहे ज्यावेळी शेतकऱ्यांचा संताप उफाळतो, तेव्हा सरकारंही हादरतात.
म्हणूनच या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही, तर फक्त एका अधिकाऱ्याची नाही तर संपूर्ण कृषी विभागाची पत धोक्यात येईल.)
बेलोरा भ्रष्टाचार प्रकरण तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दडपण्याच्या घटनेमुळे केवळ एका अधिकाऱ्याची नाही तर संपूर्ण कृषी विभागाची नामुष्की झाली आहे