
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- -बाजीराव गायकवाड
जोमेगांव :- येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ह.भ.प.वै.मामासाहेब महाराज मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक ६/०५/२०२२ शुक्रवार ते दिनांक १३/०५/२०२२ शुक्रवार पर्यंतआयोजित करण्यात आला आहे. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.पहाटे ४ते६ काकड आरती, ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,१० ते १ गाथा भजन,दुपारी ३ ते ५ भावार्थ रामायण कथा, सांयकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व नंतर हरिजागर होईल. दिनांक ६/०५/२०२२ शुक्रवार रोजी रात्री ९ ते ११ किर्तन युवा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह.भ.प.इंजी.प्रविण महाराज पिंपळदरीकर यांचे किर्तन.दि.७/०५/२०२२ शनिवारी ह.भ.प. परमेश्वर महाराज सोमसवाडीकर यांचे किर्तन. दि. ८/०५/२०२२ रविवारी ह. भ. प. मैनाताई हिप्परमाळकर समाज प्रबोधनकार यांचे किर्तन. दि. ९/०५/२०२२ सोमवारी ह. भ. प. त्र्यंबकअप्पा स्वामी नंदगावकर यांचे किर्तन. १०/०५/२०२२ मंगळवारी ह. भ. प. व्यंकट महाराज दगडवाडीकर यांचे किर्तन. दि. ११/०५/२०२२ बुधवारी ह. भ. प. चंद्रकांत महाराज लाठकर यांचे किर्तन. दि. १२/०५/२०२२ गुरुवारी ह. भ. प. विश्वनाथ महाराज काकांडीकर यांचे किर्तन. दि. १३/०५/२०२२ शुक्रवारी गुरुवर्य भागवताचार्य ह. भ. प. मधुसूदन महाराज कापसीकर यांचे काल्याचे किर्तन आहे. तरी परिसरातील हरिभक्तांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घेवून सहकार्य करावे असे समस्त गावकरी मंडळी मौजे जोमेगांव यांनी सांगितलेआहे.