
दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण (दादा)रणबागुल यांची माहिती.
भूम:- सर्वधर्मीय सामुहिक विवाहाचे आयोजन प्रवीण दादा रणबागुल सामाजिक फाउंडेशन भूम-परंडा-वाशी यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतनिमित्त १ जूनला भुम येथे करण्याचे योजले आहे. तरी या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त वधू-वर पालकांनी नोंदणी करावी असे आवाहनही प्रवीण रणबागुल यांनी केले आहे. गेल्या दोन- तीन वर्षापासून भूम-परंडा-वाशी लगतचा परिसर दुष्काळाने होरपळत असून, गेल्या वर्षापासून दुष्काळ, नापिकी, गारपीट, अवकाळी पाउस, अस्मानी व सुलतानी संकटांच्या मालिकेने शेतकरी हवालदील झाला. आपल्या पाल्याचे विवाह कसे करावे या प्रश्नाने शेतकरी व शेतमजुरांची झोप उडाली. शेतकर्यांना दिलासा म्हणून १जूनला सर्वधर्मीय सामुहिक विवाहाचे आयोजन प्रवीण दादा रणबागुल सामाजिक फाउंडेशन भूम-परंडा-वाशी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.