
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -रामेश्वर केरे
गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा,फुलशिवरा परीसरात अनेक महिन्यांपासून कृषी सहायक येत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. खरं सरकारी कर्मचाऱ्यांना स्थानिक मुख्यालय राहण्याचे बंधककारक असून या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून गवळी शिवरा,फुलशिवरा परीसरात नेमलेला मुजोर कृषी सहायक तर अनेक कीत्येक दिवसांपासून बेपत्ता आहेत.या संदर्भात देखील काही स्थानिक शेतकऱ्यांनी वरीष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु वरीष्ठ तालुका कृषी अधिकारी देखील कामचुकार असल्याचे दिसून येत आहे. गवळी शिवरा परीसरात शेतकरी बागायतदार असून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा प्रयत्न करतात त्यांना अधिक मार्गदर्शनासाठी व विविध योजनांची माहितीसाठी कृषी सहायक गावातच येत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येथील कृषी सहायक स्व:तला वीर कर्मचारी समजून नेमणूक दिलेल्या गावी जात नसल्याने तात्काळ या कृषी सहायकाची बदली करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
प्रतिक्रिया
यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासोबत या प्रश्नासंदर्भात संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही