
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्याचे राजकारण करून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरु आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करू नये, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणतेही सरकार हे कायदा, नियम आणि संविधानाने चालते. असे अल्टिमेटम दिल्यामुळे राज्यात शांतता टिकून राहण्यासाठी गृहमंत्र्यांनी योग्य त्या सूचना पोलिस प्रशासनाला केल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. कोणत्याही राजकीय पक्षाने अशाप्रकारे वागणे अथवा वक्तव्य करणे बरोबर नाही असेही ते म्हणाले.