
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
पुणे, 05 मे : ‘बाबरी प्रकरणात मी 6 वेळा सीबीआय समोर साक्ष दिली. तेव्हा भाजपचे लोक पळून गेले होते आणि आता सांगत आहात आम्ही पाडली’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पार पडलेल्या मेळाव्यात बोलत असताना संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. ‘बाबरी प्रकरणात मी 6 वेळा सीबीआय समोर साक्ष दिली. तेव्हा भाजपचे लोक पळून गेले होते आणि आता सांगत आहात आम्ही पाडली.
तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर होय अभिमान आहे शिवसैनिकांचा, म्हणून ते हिंदुहृदसम्राट आहे. आता बनावट लोकांचा जमाना आहे, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला. ‘यांचे लाडके देवेंद्र मुख्यमंत्री होते, तेव्हा त्रास नाही झाला. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची गंमत वाटते.
मला या महाराष्ट्रात ब्राम्हण मुख्यमंत्री झालेला पहायचं. कशाला जाती पाती मध्ये अडकवता. हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे .तुम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवाय ना पण मुख्यमंत्री कोण होणार हे शिवसेना ठरवणार आणि हो, या महाराष्ट्राला पहिला ब्राम्हण मुख्यमंत्री बाळासाहेबांनी दिला होता, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.