
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
निसर्गसेवा हिच खरी देशसेवा – मनोहर पाटील भोसीकर
लोहा : – राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मनोहर पाटील भोसीकर यांच्या वाढदिवसानिमित्त 57 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वखर्चाने 57 तरूणांचा जीवन विमा काढून अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. व त्यांच्या जन्मादिनानिमीत्त वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी निसर्ग प्रेम व आरोग्य , जिवन पर्यावरण या मुल्यांची जोपासना केली.
निसर्गसेवा हिच खरी ईश्वरसेवा कोव्हिड काळात ऑक्सिजनचा तुटडवा पडल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असे प्रतिपादन यावेळी मनोहर पाटील भोसीकर यांनी केले. मनोहर पाटील भोसीकर यांचा 57 वा वाढदिवस शिध्देश्र्वर महादेव मंदिर पानभोसी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास लोहा ता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील कराळे,कंधार ता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवदासराव धर्मापुरीकर,पानभोसीच्या सरपंच सौ.राजश्रीताई मनोहर पा.भोसीकर,ग्रा.प.सदस्य सौ.ताहेराबी रसुलसाब, कंधार शहरअध्यक्ष राजकुमार केकाटे,शिवराज पाटील पवार,साईनाथ पाटील फाजगे,दत्ताभाऊ कारामुंगे,सुभाष पाटील राहेरकर,रामभाऊ पवार,स्वप्नील पांचाळ,गजानन पालीमकर,प्रल्हाद पवार,
भुंजगराव कारामुंगे,माणिकराव भोसीकर,यजाज रहीमसाब,विशाल गोंन्ड,बालाजी डोम,विश्वेश्वर पांचाळ,अशोक पाटील,शे.रहीमसाब हसनसाब,विश्वाभंर डुबूकवाड ईत्यादी बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते उत्कृष्ट सूत्रसंचालन गुरुनाथ कारामुंगे यांनी केले.