
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
कृषी सहाय्यक कोपनर यांच्या कामचुकार वृत्तीमुळे सायाळ सज्जा मधील अनेक शेतकऱ्यांच्या योजना रखडल्या 10 ऑगस्ट रोजी सायाळ सज्जाचा कार्यभार घेतल्यानंतर सजा मधील सायाळ जामगा शिवणी वाळकेवाडी सुनेगाव मध्ये फक्त दोन भेटी घेतल्या चारही गावातून शेतकरी कृषी सहाय्यक कोपनर यांना फोन करत असतात कोपनर उडवाउडवीचे उत्तर देत माझ्याकडे सावरगाव सज्जाचा कार्यभार आहे मी तिकडे पोखरामध्ये काम करत आहे अशी उडवाउडवीची उत्तर देतात. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असुन लोहा तालुक्यापासुन सर्वात जवळ असलेला सज्जा सायाळ आहे कृषी सहायक कोपन शेतकऱ्यांना तुमच्या गावाकडे येण्यासाठी मला वाहन भेटत नाही म्हणून मी इथूनच काम करते असे भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांना बोलतात . कृषी सहाय्यक कोपनर यांच्या यांचा कामचुकारपणामुळे अनेक शेतकऱ्यांचे ठिबक तुषार कांदा चाळ कडबा कुट्टी मोटार माहिती अभावी झाली रद्द खरीप हंगाम जवळ आला आहे तरीही कृषी झाली असुन कृषी सहाय्यक कोपनर यांनी गावांमध्ये खरीप नियोजनाची कुठलीच माहिती शेतकऱ्यांना दिलेली नाही.
महाडीबीटी मध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे मिळतात याचा प्रसार कृषी सहाय्यक कोपनर यांनी गाव पातळीवर करायला पाहिजे पण सज्जला भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाची कुठलीच माहिती मिळत नाही. कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या पिक स्पर्धेमध्ये सज्जा मधील अनेक शेतकरी भाग घेण्यासाठी इच्छुक असताना कृषी सहायक कोपनर यांना कुठलीच माहिती दिली नाही त्यामुळे चारीही गावांमधून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही कृषी सहाय्यक कोपनर शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत मोजक्याच लोकांशी त्यांचा संपर्क आहे आणि त्यांचेच काम तालुक्याच्या ठिकाणी बसुन बसुन करतात अशा भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी सज्जातील शेतकरीवर्ग करत आहे.