
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी-विशाल खुणे
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीला राज्यस्तरीय संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित
पुणे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान ऑटो क्लस्टर येथे करण्यात आला .
यावेळी मानवी हक्क आणि संरक्षण जागृतीचा सन्मान संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ एस.एन. पठाण व संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की आम्ही संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जनजागृतीच्या पटनाट्य तसेच शैक्षणिक क्षेत्रातील बोगस संस्था यांच्या वर संस्थेच्या माध्यमातून अनेक गुन्हे दाखल केले आहेत अशा विविध उपक्रमांची दखल घेतली म्हणून गुणवंत कामगार कल्याण मंडळानी आमचा सन्मान केला हा सन्मान माझा नसुन माझ्या सर्व सभासद ,पदाधिकारी यांचा आहे असे जोगदंड म्हणाले
डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या कि ज्या 11 संस्थाचा सन्मान केला त्या त्या संस्थानी अधिक अधिक जबाबदारीने समाजहिताचे काम केले पाहिजे, संस्थेचे पदाधिकारी यांनी आपला वेळ समाजहितासाठी घालवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
नागपूर विद्यापीठाची मा. कुलगुरू एस.एन,पठाण त्यावेळी म्हणाले की संस्थानी आपली सामाजिक कामे कोणत्याही जाती धर्माच्या आड आणता कामा नये ,आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते दिले पाहिजे या मानवतेच्या उदात्त भूमिकेतून कामे करण्याचा सल्ला दिला.
यावेळी नागपुर संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस.एन.पठाण संस्थेचे अध्यक्ष डॉ भारती चव्हाण ,सचिव राजेश हजारे ,अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान भोसले, टाटा मोटरचे जनरल सेक्रेटरी संतोष दळवी , संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, मुख्य सल्लागार अनिल कदम ,शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करांजवणे ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, सुरेश वाघमारे, गजानन धाराशिवकर युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे अनेक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.