
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उपसभापती पदी शेटफळ हवेली येथील रामचंद्र शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी जिजाबा गावडे यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.अनुभवी संचालक म्हणून आदिनाथ धायगुडे यांची सभापतीपदी उपसभापतीपदी शिक्षक भारतीचे युवक नेते रामचंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.
गावडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत सभापतीपदाची सूचना विद्यमान संचालक बालाजी कलवले यांनी मांडली. त्यास संचालक संतोष गदादे यांनी अनुमोदन दिले.इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य सभासद शिक्षक बंधू-भगिनींच्या हितास प्राधान्य दिले जाईल.शिवाय संस्थेचा कारभार हाकत असताना तो पारदर्शक असेल असे आश्वास न नूतन सभापती आदिनाथ धायगुडे यांनी दिले.तर काम करत असताना सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची ग्वाही उपसभापती रामचंद्र शिंदे यांनी दिली.
या निवडी प्रसंगी बोलताना पॅनल प्रमुख नानासाहेब नरुटे म्हणाले की,जी 44 आश्वासने आम्ही दिली आहेत त्याची पूर्तता येत्या पाच वर्षांमध्ये करणार आहोत.नवनियुक्त 21 संचालक विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या निवडणूकीत पॅनल निवडीमध्ये मोलाची भूमिका बजावली.यापुढे सर्वजन एकोप्याने काम करणार आहोत.
नवनिर्वाचित इंदापूर तालुका शिक्षण सहकारी पतसंस्थेचे उपसभापती मा.श्री.रामचंद्र शिंदे हे शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व राजवर्धन चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संजय (मामा) शिंदे यांचे चुलत बंधू आहेत.