
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड.
पेठवडज :- नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा अशोकराव चव्हाण साहेब,व मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सर चिटणीस शिवाजीराव पवार , जिल्हाध्यक्ष दादाराव बुक्तरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचे प्रभावी अंमलबजावणी व सर्व जातीधर्माच्या व वंचित घटकांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी गजानन जाधव पेठवडजकर यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवी पाटील कावलगावे , चंद्रकांत देशमुख, मनोज इंगोले, प्रकाश कंधारे, चंदन जोगदंड, मनोज शिंदे, संभाजी मेकवाड हे उपस्थित होते.