
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहयात शिवा संघटनेच्या वतीने दि.११ हे २०२२ रोजी समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंतीचे व भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून नांदेड दक्षिण चे आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच स्वागताध्यक्ष म्हणून लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे राहणार आहेत.
तसेच यावेळी गुरुउपदेश शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, गुरुवर्य राजशेखर महाराज, श्री गुरु स्वामी हे करणार आहेत.
तसेच दुपारी ३ वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक शिवमंदिर जुना लोहा ते व्यंकटेश गार्डन लोहा पर्यंत काढण्यात येऊन व्यंकटेश गार्डन येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची तेलचित्राच्या मिरवणूकीचे विसर्जन करण्यात येईल.
तेव्हा या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शेटे, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत भाऊ शेटे, माऊली पाटील पवार, बाळासाहेब पाटील जाधव, गणेश घोडके, सरपंच कैलास धोंडे, साधू पाटील वडजे,शुभम घोडके अंकुश सोनवळे, गोविंद आणेराव, सुर्यकांत आणेराव, मुकेश भालके,चंदु बेंद्रे, राजू पिल्लोळे, मानसपुरे, बावनपले, आदींनी केले आहे.