
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी-राहुल रोडे
बोरफळ ते शिवली मोडदरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर दि. ५ मे रोजी दुपारच्या सुमारास एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडली होती. या रस्त्यावरून आपल्या तावशी गावाकडे छावाचे विजयकुमार घाडगे जाताना त्यांना जखमी व्यक्ती दिसली आणि त्यांनी तात्काळ गाडी थांबूवन त्याला पिण्याचे पाणी देत आधार दिला. तात्काळ १०८ नंबर रुग्णवाहिकेला फोन करून अवघ्या काही मिनिटात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ‘छावा’च्या या मावळ्याने प्रसंगावधान राखत केलेले कार्य म्हणजे माणुसकीचे दर्शन घडविणारे आहे.
रस्त्यावर अपघात झाला की त्यावेळी मदतीची भावना प्रत्येकांनी ठेवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर वेळेत उपचार मिळाला तर त्याचे प्राण वाचले जाऊ शकतात. गुरुवारी असाच अनुभव दिसून आला.
बोरफळ – शिवलीमोड रस्त्यावरील उड्डाणपुलावर बेलकुंड येथील एक जण जखमी अवस्थेत पडला होता. जखमी जवळ जाऊन विजयकुमार घाडगे यांनी त्याला आधार दिला आणि १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. पण ती आली नाही. लगेच त्यांनी बेलकुंड येथील आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका स्वतः जाऊन आणली व सदर जखमीला त्या रुग्णवाहिकेत बसवून तात्काळ उपचारासाठी दाखल केले.