
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार माळेगाव मक्ता चे सरपंच शिवराज पाटील माळेगावकर यांना जाहीर करण्यात आला. सत्कार्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते असा ध्येय बाळगत कोरोणाच्या महामारीत दुसरा कोणी येऊन मदत करेल याची जराही वाट न पाहता गावाचे पालकत्व स्वीकारत आपल्या जीवाची जराही पर्वा न करता कोरोणाच्या काळात अखंडपणे गावची सेवा केली. ज्यामध्ये ज्यामध्ये रॅपिड टेस्ट करणे, गावातील 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, गावात घराघरात जाऊन आशाताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी करून त्यांची ऑक्सिजन लेवल, तापमान चेक करणे, प्रत्येक कुटुंबाला सेफ्टी किट, विटामिनच्या गोळ्या, सॅनी टायझर, मास्क, साबण उपलब्ध करून देणे. तसेच गाव कोरोणा मुक्त करण्यासाठी रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, त्यांच्यावर उपचार करणे, स्वतंत्र विलगीकरण तथा लसीकरण करून त्यांची सेवा करणे. अशा अनेक समाज उपयोगी कार्याची विशेष दखल घेत माळेगावचे सरपंच शिवराज पाटील यांना मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार घोषित करण्यात आले. अत्यंत मनमिळावू तसेच विविध पदांचा कसलाच गर्व नसणारे शिवराज पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सबंध जिल्हा तालुका व गाव तसेच मित्राकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय संबंध गाव हेच माझे कुटुंब असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गावची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच शिवराज पाटील माळेगावकर यांनी व्यक्त केली आहे.