
दैनिक चालू वार्ता कोरेगांव प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांतील सर्व परिचित असणारे अगदी सामाजिक राजकीय व विविध धार्मिक वारसातुनच असे थोर या डॉ. अविनाश पोळ साहेब आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र चांगलेच कौतुक होत असुन आपण पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावांना पाणीदार केले. या कार्यात आपण एक लोकसेवक म्हणून कायम झटत राहिला आपण सामाजिक कार्यामधून अनेक कार्यकर्ते या प्रवाहांत यांच्या जीवनाला एक दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमांतून घडत गेले डॉक्टर म्हणून आपली कारकीर्द चांगलीच सर्वपरिचित आहे असुन पण त्यातूनच जनसामान्यांसाठी केलेले कार्य हे सदैव आमच्या ऋणांत राहील पोळ साहेब तुम्ही सदैव महाराष्ट्रांतील गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य देत असता त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल करंजखोप ग्रामस्थ मंडळ अखंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व करंजखोप परिसरांतील व पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत व सन्माननीय श्रीमंत मा. संजीवराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा यांच्या उपस्थितीने आपणांस महर्षी च्यवन महाराज जीवन गौरव पुरस्कारांने सन्मानिंत करण्यांत येणार आहे.