
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
भेंडवळ (जळगाव जामोद): दि.८.जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी गावाबाहेर शेतात जे घट मांडणी करून जे काय भाकीत वर्तविण्याची परंपरा आहे. हे भाकीत केवळ एक थोतांड आहे. संभा व्यतेच्या नियमावर बाकी कोणीही चुकला किंवा न शिकलेला मिरज व्यक्तीदेखील परिस्थितीजन्य तार्किक विचार करून एकंदरीत पर्जन्यमानाचा, हवामानाचा, पर्यावरणाचा, शासकीय कार्यालयात वर्तवलेल्या अंदाजाचा अभ्यास करून असे भाकित वर्तवले जाऊ शकतो. असे म्हटले जाते की चंद्रभान वाघ या व्यक्तीला निलवंती नावाची विद्या प्राप्त होती. आणि आता तुझे पुंजाजी रामदास वाघ जे भाकीत करतात ते त्यांचेच वंशज आहे. खरंच या कुटुंबांमध्ये अशी निलवंती किंवा कुठलीही आलोकिक शक्ती अतिंद्रिय शक्ती जर अस्तित्वात असेल तर यांनी ते सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 25 लाखाचे आव्हान स्वीकारावे. देशातील अर्थ व्यवस्था, शासन व्यवस्था, संरक्षण व्यवस्था ,प्रजन्यमान आणि पीक पाणी इत्यादी वेग वेगळ्या विषयावर हे भविष्य वर्तवतात. खरंच हे भविष्य संपूर्णपणे खरे ठरतात का.संभाव्य ते च्या नियमानुसार शंभर भाकिते जर कोणी सांगितले फक्त 50% भाकिते खरी ठरण्याचा संभव हा निश्चितच असतो. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की तीनशे ते साडेतीनशे वर्षाची भाकित वर्तवण्याची परंपरा या घराला लाभलेली आहे. परंतु प्रत्यक्ष चौकशी केली असता यांच्याकडे तीनशे वर्षाचे कुठलेही पुरावे नाही. आपल्या घराण्यातील वारस पुंजाजी वाघ हे अत्यंत साधे भोळे व्यक्ती आहे.परंतु त्यांच्या भावकेतील जे सारंगधर वाघ आहेत हे तार्किक विचार करून भाकित वर्तवण्यात लुडबुड करताना दिसून येतात.ही फक्त अंधश्रद्धा आहे असे शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्याच्या भावी पिढीतील युवकांनी अशात थोटांड वर विश्वास न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करावी. बळीराजानी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये. ही विनंती करत आहोत. 25 लाखांचे अंधश्रद्धा निर्मूलन चे आव्हान आहेच की. यांनी सांगितलेले भाकीत खरे तपासून पाहिले तर अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षातील भाकिते पूर्णपणे खरे ठरल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षाची भाकित तपासले असता यांनी असं म्हटलं होतं की, कपाशीचे पीक उत्तम येईल परंतु कपाशीचे पिक नाम मात्र आले, हरभरा पीक साधारण सांगितले होते परंतु सर्वत्र हरभरा पीक उत्कृष्ट आले. उडीद मुगाचे पीक साधारण राहील, परंतु उडीद मुगाचे पीक त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य होते. घटमांडणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवतात परंतु कपाशी नंतर सोयाबीनचा पेरा असतो तशी घटमांडणी मंध्ये सोयाबीनला थारा नाही. कारण सोयाबीनचे पीक हे या भागांमध्ये अलीकडे म्हणजे जवळ जवळ 30 वर्षापासून जास्त प्रमाणात घेतला जात आहे.दुसरी गोष्ट म्हणजे या गटामध्ये कुरडई ,करंजी ,पुरी या सारख्या पदार्थांचा वापर करतात आणि यासारखे पदार्थ तिथे या साहित्य मध्ये मांडतात. वास्तविक हे पदार्थ तर महिलाच बनवतात परंतु याही घटमांडणी जेव्हा चालते त्या परंपरेमध्ये त्या कुठेही महिला समाविष्ट झालेली दिसून येत नाही. वास्तविक त्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही. आणि हे घटमांडणी गावाबाहेर शेतामध्ये केल्या जाते.आणि आतापर्यंत तिथे कुठेच महिला उपस्थित दिसत नाही म्हणजे तिथे स्री पुरुष असमानता देखील जोपासल्या जात नाही.अशा भाकितं वर विश्वास ठेवून जर बळीराजा आपल्या निर्णय घेत असेल तर “जग चालले पूर्वेकडे आणि आम्ही चाललो पश्चिमेकडे”अशी आपली दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही. जादूटोणाविरोधी कायद्यात 2013 नुसार असे अंधश्रद्धा युक्त कार्यक्रम पसरवणे अंधश्रद्धेची भाकिते करणे, आमच्या मध्ये किंवा आमच्या वारसाकडे किंवा आमच्या कुटुंबाकडे काहीतरी अलौकिक, आदितिय शक्ती आहे असे म्हणणे हे गुन्हा पात्र कृतीमध्ये मोडते. असा गुन्हा पात्र कृती केल्यास या कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
प्रतिभा भुतेकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, महिला अध्यक्ष जिल्हा बुलढाणा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अशासकीय सदस्य बुलढाणा.