
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-रामेश्वर केरे
मतदार संघातून गेलेला समृद्धी महामार्ग, धुळे/सोलापूर महामार्ग, नाशिक/औरंगाबाद महामार्ग,नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते उदघाट्न झालेला नव्याने प्रस्तावित असणारा प् औरंगाबाद, नगर,पुणे हा चारपदरी महामार्ग व वाळूज औद्योगिक क्षेत्रातून जाणारा नागपूर /मुबंई महामार्ग, तर लासूर स्टेशन,पोटुळ, लोहमार्गाचे विदयुत्तीकरण हे गंगापूर तालुक्यान गेल्याने यामुळे शेतकरी व एम.आय.डी.सी दळवळण, बांधकाम इन्फाट्रक्चरसाठी मदत होणार असून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अकोळनेर ते गंगापूर, औरंगाबाद ही गॅस पाईपलाईन आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याने औद्योगिक, घरगुती क्षेत्राला लागणारां गॅस थेट उपलब्ध होणार असल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्र व नव्याने प्रस्तावित आरापूर/गवळी शिवरा येथील प्रस्तावित एम.आय.डी.सीला एकप्रकारे अमृताचा प्याला गवसला असल्याने गंगापूर/खुलताबाद मतदार संघाचा विकासाचा वारू चौफेर दवडणार यात शंका नाही.
आपल्या गंगापूर/खुलताबाद मतदारसंघातील वाळूज,घानेगाव, रांजणगाव, पंढरपूर,येथील औद्योगिक क्षेत्रात वाढता आलेख पाहता अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी जागेचा पर्याय म्हणून शासनाने येथून जवळच असलेल्या गवळीशिवरा,सुल्तानाबाद, आरापूर शिवारातील जमिनीचा सर्व्हे केला आहे.त्यानुसार या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी या तिन्ही गावांचे मिळून जवळपास ९५८.१३ हेक्टर आर एवढे क्षेत्र संपादित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन असून काही कालावधीत ही एम.आय.डी.सी.कार्यान्वित करणारच असा आशावादही आमदार प्रशांत बंब यांनी दैनिक चालु वार्ताशी बोलताना व्यक्त केला असून गंगापूर तालुक्यातील वाळूज महानगरचा औद्योगिक विकास झपाट्याने झाल्याने अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे.त्याबरोबरच वाळूजपासून कायगाव टोक्यापर्यंत अनेक उद्योजकांनी उद्योग उभारले आहेत तसेच ए.एस.क्लब, करोडी ते लासूर स्टेशन पर्यतही अनेक छोटे मोठे उद्योगही उभारले गेले आहे तरीही समृद्धी महामार्ग मतदार संघातून गेल्याने आरापूर येथील एम.आय.डी.सी लवकरात लवकर चालू होण्यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न चालू असून त्याठिकाणी कृषी उत्पादने व कृषी उर्वरके किंवा कृषी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे ते शेतकऱ्यांसाठी वाटेल ती किंमत मोजून गवळीशीवरा आरापूर येथील प्रस्तावित एम.आय.डी.सी चे मंजुरीचे काम अंतिम टप्यात असल्याचेही आमदारांनी सांगितले तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नमुळे समृद्धी महामार्ग, धुळे/सोलापूर महामार्ग, नव्याने घोषणा झालेला औरंगाबाद /पुणे महामार्ग व नागपूर /मुबंई महामार्ग, तर लासूर स्टेशन,पोटुळ, लोहमार्गाचे विदयुत्तीकरण हे गंगापूर तालुकटून गेल्याने यामुळे शेतकरी व एम.आय.डी.सी दळवळण, बांधकाम इन्फाट्रक्चर साथी मदत तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अकोळनेर ते गंगापूर, औरंगाबाद ही गॅस पाईपलाईन आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याने व प्रत्यक्ष काम युद्धपातळीवर चालू असल्याने औद्योगिक, घरगुती क्षेत्राला लागणारां गॅस उबलब्ध होणार असल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्र व नव्याने प्रस्तावित आरापूर/गवळीशिवरा येथील प्रस्तावित एम.आय.डी.सी ला गंगापूर खुलताबाद मतदार संघाला एकप्रकारे अमृताचा प्याला गवसला असल्याने गंगापूर/खुलताबाद मतदार संघाचा विकासाचा वारू चौफेर दवडणार यात शंका नाही.
खुलताबाद तालुक्यातही औद्योगिक कंपन्या आणण्यासाठी मी जातीने लक्ष घातले आहे मात्र एम आयडिसिसाठी पाण्याचा स्रोत महत्वाचा असल्याने कंपण्यासाठी जेवढे पाणी लागेल त्याचे नियोजन अगोदर करावे लागेल म्हणून खुलताबादचा समावेश जल मिशनमध्ये होण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा केला आहे केले त्यामुळे खुलताबादचा समावेश नक्कीच जलमिशन योजनेत होईल व त्यानंतर खुलताबाद तालुक्यात एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा होईल व गंगापूर/खुलताबाद तालुका हा उद्योगाचा तालुका होऊन आपला गंगापूर/खुलताबाद तालुक्याचा एम.आय डी.सी पॅटर्न नक्कीच नावारूपाला होईल असेही आमदार प्रशांत बंब यांनी बोलताना सांगितले.