
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व ओबीसी चे नेते माननीय ज्ञानदेव उत्तम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरी येथील मा हरिभाऊ पाटील प्रतिष्ठान चे अनाथ आश्रम या ठिकाणी जाऊन तेथील अनाथ मुलांसोबत आपला वाढदिवस खाऊ अन्नधान्य वाटप करून साजरा केला. ज्ञानदेव शिंदे हे बोरी गावचे प्रगतशील बागायतदार ,त्याचबरोबर एक उत्तम व्यावसायिक आहेत, त्यांनी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले आहे.
त्यांनी आज पर्यंत आपल्या घरातील मुलांचा ,बायकोचा इतर घरातील सदस्य व आपल्या लग्नाचा वाढदिवस अशाच पद्धतीने इतरत्र वायफळ खर्च न करता अनाथ आश्रम किंवा सामाजिक कार्य करून साजरा करतात. ते आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या संस्था व संघटना यामध्ये कार्यरत राहून काम करतात.
या त्यांच्या कार्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे .अशा समाजसेवकास दैनिक चालू वार्ता कडून ही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
या वेळी बोरी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा श्री ज्ञानदेव उत्तम शिंदे, मा श्री गणेश आण्णा शिंदे, विनायक उत्तम शिंदे, धीरज पांडुरंग शिंदे,मा.हरिभाऊ पाटील प्रतिष्ठान चे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.