
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
उमरा :- लोहा तालुक्यातील उमरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वराज्यविर, स्वातंत्र्यविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा दिनांक १४/०५/२०२२ रोज शनिवारी छत्रपती संभाजी महाराज चौक उमरा येथे साजरा करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यक्रमाची रूपरेषा मा. स्वप्नील पाटील उमरेकर मा. सभापती खरेदी-विक्री संघ लोहा सकाळी ठिक १०:०० वाजता यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गुरुराव पाटील सिरसाट मा. तंटामुक्ती अध्यक्ष उमरा, कार्यक्रमाचे उध्दघाटन श्री. मोहनराव पाटील सिरसाट अध्यक्ष कै. गोविंदराव पाटील शिक्षण संस्था उमरा, प्रमुख पाहुणे मा. शिवश्री सुभाषराव पाटील कोल्हे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नांदेड, मा. श्री. भास्करराव पाटील जोमेगांवकर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड, श्री. डी. एच. देशपांडे ग्रामपंचायत प्रशासक उमरा, तसेच सांयकाळी ७:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवा निमित्ताने भव्य किर्तन सोहळा किर्तनकार ह .भ.प.इंजि.प्रविण महाराज पिंपळदरीकर युवा कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार यांचे किर्तन. आयोजक संभाजी ब्रिगेड शाखा उमरा व समस्त गावकरी मंडळी उमरा ता. लोहा जि. नांदेड यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन किर्तन सोहळा व जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे कळविले आहे.