
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी – माधव गोटमवाड
सरस्वती पब्लिक स्कूल घोडज ता. कंधार जि.नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. SOF (Science olympiad foundation, Delhi) आयोजित घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन सरस्वती पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते.त्यामध्ये English, Science, Marathi, GK या विषयांमध्ये Gold medal, silver medal, bronze medal मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री. प्रा. साईनाथ व्यंकटी पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय सखाराम राठोड( सिद्धिविनायक मिल्ट्री फाऊंडेशन, घोडज) प्रमुख पाहुणे प्रा.आदित्य गव्हाणे सर( आयडियल कोचिंग क्लासेस, कंधार) डॉ.प्रवीण जाधव साहेब, उत्तमरावजी चव्हाण साहेब( पंचायत समिती सदस्य, कंधार), भीमराव पाटील लाडेकर( पोलीस पाटील घोडज), प्रा. राजूरकर सर, प्रा.लोंढे सर, प्रा. स्वप्निल राठोड सर, प्रवीण लाडेकर सर, हे उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक प्रवीण लोणे सर पंकज ढवळे सर दिलीप बसवंते सर रवी कांबळे सर उमेश श्रीमंगले सर राठोड मॅडम व सर्व पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गायकवाड सर यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व पालक वर्गाचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शन संस्थेच्य अध्यक्ष शशिकला किसनराव राठोड यांनी केले.