
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा तालुक्यांतील मिलिटरी अपशिंगे गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत माने वय 55 यांना देशसेवा बजावत असताना मंगळवारी 10 मे रोजी पहाटे वीरमरण आले. ते गुजरातमधील जामनगर येथे कर्तव्य बजावत होते त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली गेल्याने त्यांना तातडीने लष्करी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयांत दाखल केले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या जाण्यांने संपूर्ण सातारा तालुक्यांत शोककळा पसरली . शौर्याची, धैयांची पराक्रमाची बाल दिनाची गौरवशाली परंपरा आहे देशसेवा ही परंपरा कायम राखत वीर जवान सुधीर निकम यांना देशाची एकच अखंडता व लोकशाहीचे रक्षण करीत असताना त्यांना वीरमरण आले देशाची सेवा बजावताना त्यांनी केलेल्या त्यागांस सातारच्या वीर सुपुत्र ला सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वहिनी सुधीर निकम हे मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा असा परिवार आहे सुधीर निकम यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा होती त्यांचे वडील सुर्यकांत शंकर निकम हे १९९५ मध्ये सिककींमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले होते. तर त्यांचे धाकटे बंधू सागर निकम हे देखील लष्करी सेवेत कार्यरत आहेत तर सुधीर निकम यांचे चुलते व चुलतभाऊ सुद्धा लष्करी सेवेमध्ये कार्यरत आहे.त्यामुळे निकम यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपराच म्हणावी लागेल.यावेळी सातारा जिल्ह्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुधीर निकम हे देशासांठी शहीद झाले असे म्हणत त्यांनी आपले ट्वीवरुन दुःख व्यक्त केले सुधीर निकम यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी शासकीय इतमांमात अखेरची मानवंदना देऊन त्यांना लष्करी जवानाकडूंन व मिलिटरी अपशिंगे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनसमुदाय सर्व आजी माजी मित्रपरिवार यांच्या उपस्थितींत अखेरचा निरोप देण्यांत आला. यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी बोरगांव पोलिस ठाण्यांचे पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर मॅडम व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी महसूल विभागांतील प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय सामाजिक विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधीर निकम यांना भावुक असा अखेरचा निरोप दिला यावेळी सुधीर निकम यांचे पार्थिव दाखल होताच संपूर्ण मिलिटरी अपशिंगे गावातून त्यांची भारत माता की जय, अमर रहे अमर रहे ,सुधीर निकम अमर रहे अशा घोषणा उपस्थिंतीत ग्रामस्थ माताबाहिणी व मित्र परिवार यांनी देत आपल्या गावच्या सुपुत्रांला अखेरचा निरोप दिला.