
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नरसिंहपूर, टणु, पिंपरी बुद्रुक, गिरवी, गोंदी,ओझरे,या भागातील वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास गेल्या पंधरा दिवसापूर्वी डोळ्याच्या तपासणीसाठी गावोगावी जाऊन वयोवृद्ध रुग्णांच्या तपासण्या केल्या होत्या त्यानंतर आनेक रुग्णांचे ऑपरेशन करावे लागत आसल्यामुळे त्या तपासणीतून 23 रुग्ण ऑपरेशन करण्यास पात्र झाल्यामुळे पुढील तपासणी व ऑपरेशन करण्यासाठी एच व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे या ठिकाणी सर्वच रुग्ण आज दिनांक,11/5/2022 रोजी रवाना झाले आहेत. मोहम्मदवाडी हडपसर पुणे येथील हाऊस्पीटलच्या स्वखर्चाने या भागातील रुग्ण आज दिनांक,11 रोजी घेऊन गेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच रुग्णांची तपासणी करून डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येतील असे पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुमित्रा कोकाटे यांनी माहिती दिली.
मोहम्मदवाडी रुग्णालयाच्या आलेल्या रुग्णवाहिकेचे पूजन डॉक्टर सुमित्रा कोकाटे यांनी केले तर माजी सरपंच संतोष सुतार, व सुदर्शन बोडके यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले. या निमित्त पिंपरी आरोग्य केंद्राच्या मुख्य डॉक्टर सुमित्रा कोकाटे, आरोग्य सेविका प्रियंका पाटील, आरोग्य सेवक प्रदीप बोडरे, उपसरपंच पांडुरंग बोडके, माजी सरपंच संतोष सुतार माजी चेअरमन सुदर्शन बोडके बाळासाहेब घाडगे, आनिल पाटील, सोमनाथ सुतार, आधी सर्वजण उपस्थित होते.