
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
लोहा:- आंबेडकरी चळवळीचे नेते तथा आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड हे आंबेडकरी चळवळीत गेल्या विस वर्षापासुन निष्ठेने काम करतात व गोरगरीबांच्या अडीअडचणीला व मदतीला धाऊन जातात अशा या नेत्याच्या 41 व्या वाढदिवसा निमित्त आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टी तालुका शाखा लोहाच्या वतीने शासकीय विश्रामगृह लोहा येथे “अभिष्ट चिंतन” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अनिलदादा गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी लोहा तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासुनच लोहा येथील शासकीय विश्रामगृह परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.व तालुक्यातील आंबेडकरी जनतेने व त्यांच्या मित्र परिवाराने अनिलदादा गायकवाड यांचा भव्य सत्कार करुन त्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या.यावेळी आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे मराठवाडा उपाध्यक्ष संभाजी भुजबळ,जिल्हाउपाध्यक्ष बळीराम येवले,केतन खिल्लारे,तालुकाध्यक्ष ज्ञानोबा आढाव,युवा तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे,विठ्ठल गोडबोले,पत्रकार विलास सावळे,शिवराज पवार,राहुल एडके,सचिनभाऊ आढाव,मंगेश गायकवाड,तलाठी तांबरे,सुनगिरवार,जाधव,विकास वाघमारे,आत्माराम गायकवाड,आकाश सोनसळे,विशाल सोनसळे आदी.प्रामुख्याने उपस्थीत होते