दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते :
बारामतीतील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे SPCT’s EXED ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स व लातूर सायन्स अकॅडमी, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी यशाची गुरूमंत्र १० वी परिक्षेचा” या जीवन बदलणाऱ्या ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा विशेषतः इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२६ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून, ती २७, २८ व २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे.
या कार्यशाळेत गणित, विज्ञान, इंग्रजी तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील प्रश्न, तज्ज्ञ शिक्षकांचे स्पेशल टिप्स, पेपर लिहिण्याची पद्धत, वेळ व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. तसेच, NEET, JEE, UPSC, MPSC या स्पर्धा परीक्षांविषयी प्रेरणादायी माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शुल्क :नियमित विद्यार्थी (राहण व जेवणासह): फक्त ₹499/-
अतिथी विद्यार्थी: फक्त ₹199/-ही कार्यशाळा SPCT’s EXED ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, बारामती येथे होणार असून, अधिक माहितीसाठी राहुल सर –8605515061 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.