
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.११. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( महाराष्ट्र शासन) अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात मा. पालक मंत्री राजेंद्र शिंगणे तथा जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे ही यादी जाहीर करण्यात आली असून समितीसाठी अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. अध्यक्ष पदी केशव तानाजी मापारी यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी मुक्तार बेग नजीर बेग मिर्झा,विशाल सोपान दांडगे, सौ. कल्पना गणेशराव मुकुंद, गोविंदा पांडुरंग इंगळे, बिस्मिल्ला खा गफार खा, बाबुराव जानराव शिवलकर, राजेश भानुदास काटे आदी ची नियुक्ती करण्यात आली. या समितीचे सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार काम पाहणार आहे. शासकीय सदस्य प्रभाग अधिकारी आहेत. मागासवर्गीय अशासकीय सदस्य, महिला सदस्य, इतर मागास वर्गीय/विभाजन सदस्य, सर्व साधारण सदस्य, दिव्यांग सदस्य, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचे अशासकीय सदस्य, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता, ज्येष्ठ नागरिक यांचाही यात समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थी निवडीचे काम हे कमिटी करणार आहे.