
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
किर्ती मोठी राजाची गा राजाची
धर्मरवीर राजा त्या शंभू मर्दाची.
छत्रपती तो राजा मराठा आमुचा
सिंहाचा छावा शान महाराष्ट्राची…!!१।।
शिवरायांचा पुत्र होता शूरवीर
डोळ्यात निखारा हाती तलवार
नाही झुकली मान शंभूराजाची
होती शिकवण राजे शिवरायांची…।।२।।
शंभू झाले राजे थोर महाराष्ट्राचे
हसले सिंहासन बत्तीसमन सोन्याचे
थरथरली मोगलशाही विजापूरची
दिल्ली तक्ताला धडक शंभूराजांची….।।३
।
स्वराज्याच्या रक्षणा शंभू झाले ढाल
दरी डोंगरी अंधारी ती पेटली मशाल
मावळे मराठी शूर निधड्या छातीची
नाही केली पर्वा तो मावळा जीवाजी..।४।।
धर्मासाठी राजा शंभू माझा लढला
प्राण गेला तरी नाही शत्रूपूढे नमला
शिवशंभूची ही माती महाराष्ट्राची
गडकोटावर डौवले निशान भगव्याची…!!५!!
कवी सरकार इंगळी
१३/५/२२