
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
नांदेड – औरंगाबाद येथील गुरूदेव रविंद्रनाथ टागोर कला , साहित्य , विचार संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा युनिव्हर्सल टॅलेंट टिचर ॲवार्ड परभणी जिल्ह्यातील ब्रामणगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील शिक्षका सोनाली अरुण डहाळे यांना सिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सतत शैक्षणिक कार्यात अतिशय मोलाची कामगिरी बजावत असल्याने त्यांच्या कार्याचा आढावा घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोनाली अरुणराव डहाळे यांना प्रदान झाल्याने त्यांना शैक्षणिक , सामाजिक , राजकीय क्षेत्रातुन व जिल्हाभरातुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.