
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील अनुप सुनील सुरजूसे या योगवीराने मुंबई येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ठसा उमटवला;तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर कुस्तीपटू विजेते २०२२ गोव्यातील मपूसा येथे घेण्यात आले होते.दि.०७,०८,आणि ०९ मे २०२२ ला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील युवा कुस्ती खेळामध्ये चार कुस्तीपटूंनी जिल्ह्याचे नाव प्रकाशमान केले.१९ वर्षे वयोगटामधून कुस्तीपटू मोहम्मद कासिफ आणि ओपनमधून ५७ किलो वजनी गटात कुस्तीपटू प्रज्वल सुरेश ताडे,६१ किलो वजनी गटात कुस्तीपटू प्रज्वल राजु धुळे तर कुस्तीपटू हर्षद रवींद्र व्यवहारे ह्याने ६५ किलो वजनी गटात बाजी मारली.संपुर्ण अंजनगाव सुर्जी शहर तसेच जिल्ह्याचे नावलौकिक मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केल्या जात आहेत.
प्रामाणिकपणा हा महत्वाचा गुण आहे आणि मुलांनी लहानपणापासून तो आचरणात आणला पाहिजे.तुम्ही मुलांचे पालक आहात,त्यामुळे तुम्ही मुलांचे रोल मॉडेल आहात.तुमच्या प्रत्येक सकारात्मक अथवा नकारात्मक शब्दाचा किंवा कृतीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो.प्रत्येकवेळी प्रामाणिक राहा,खास करून मुलांच्या उपस्थितीत मुलांना सर्व परिस्थितीत सत्य बोलण्यास प्रवृत्त करा.
तुमच्या मुलांना हे समजावून सांगा की आयुष्यात शॉर्ट कट्स नाहीत.कठोर परिश्रमांचे महत्व मुलांना समजावून सांगा.त्यांना कुठल्याही कामात जसे की वाचन,लिखाण किंवा कुठल्याही विधायक कामात त्यांचे सर्वोत्तम देण्याची सवय लावा.त्यांनी हे शिकायला हवे की केवळ चांगले नशीब हे यशास कारणीभूत नसून त्यासाठी दृढ संकल्प आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे.
आपण आपल्या जीवनात कमाई करण्यासाठी किती कठोर परिश्रम कारावे लागते याचे स्पष्टीकरण आपल्या सर्वांसमोर गरिबीतून आलेल्या या विद्यार्थ्यांजवळून शिकायला मिळते.
श्रीकांत नाथे
पत्रकार,दै.चालु वार्ता अमरावती
आज आपल्या अंजनगाव सुर्जी शहराचे नाव संपुर्ण देशात ह्या विद्यार्थ्यांनी कोरले तसेच मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन,सर्वांनी वेगवेगळ्या संस्कृतीच्या मैत्रीला प्रोत्साहन द्या.मुले जन्मतःच निष्पाप आणि निःपक्षपाती असतात.भेद हा सामाजिकतेचा भाग आहे.पालक म्हणून,आपल्याला केवळ आपल्या मुलांना भेदभावाच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.त्यांना निःपक्षपाती राहण्यास शिकवा आणि गरीब असो वा श्रीमंत,शत्रू असो वा मित्र सगळ्यांशी सारखे कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन पालकांनी करायला हवे.
प्रवीण पटुकले
कार्याध्यक्ष,लहरी मित्र मंडळ
पालकांनी आपल्या मुलांचे तसेच विद्यार्थ्यांनी आपले नाव खेळांमध्ये नोंदवा.स्वत: साठी आणि आपल्या कुटुंबासाठी नियमित व्यायाम करण्यासाठी काही वेळ घालवा,जसे की चालणे,जॉगिंग करणे,पोहणे,व्यायाम करणे,किंवा योगासने इत्यादी.व्यायामाचा काळ संपूर्ण कुटुंबासाठी दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरेल.व्यायामाचा समावेश मुलांच्या दैनंदिनीत लवकर केल्यास ते मुलांना सक्रिय,तंदुरुस्त आणि लवचिक ठेवेल.हे आपल्या मुलांसाठी निरोगी जीवनशैली ठरविण्यात मदत करेल.व्यायाम करताना उत्साह वाढावा म्हणून संगीत लावा.सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मुलाचे नाव कुठल्या तरी खेळात नोंदवा.त्यामुळे तुमची मुले आयुष्याचे मौल्यवान धडे शिकतील.
ज्याप्रमाणे आज आपल्या कुस्तीपटूंनी तसेच योगवीराने आपली तालुक्याचे नाव व स्वतःची एक ओळख तयार केली तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली यशाची भरारी घेतली पाहिजे.
मनिष मेन
युवा जिल्हाध्यक्ष,भाजप