
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : देशात नेहमीच गजबजलेली काही रेल्वे स्टेशन्स आहेत, पैकी एक पुणे रेल्वे स्टेशन. या स्टेशनवर आज सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक एक बाॅम्ब सदृश वस्तू पडलेली आढळून आली, त्यामुळे या रेल्वे स्टेशनवर एकच कल्लोळ व प्रवाशांची धावपळ झाली. रेल्वे पोलीस पथक व बाँब शोधक डाॅग स्काॅर्ट ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्र. १ व क्र २ वरील काही रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. तसेच सर्व प्रवाशांना ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून पोलीसांनी तेथून जायला सांगितले आहे व तो भाग पूर्ण रिकामा करण्यात आला आहे. तेथे कोणालाही जाण्यास बंदी आहे. काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशनवर एक बाॅम्ब ठेवण्यात येणार आहे असा धमकीचा एक फेक फोन आला होता, म्हणून आता लोकांमध्ये घबराटीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला असून पोलीस पथकाने “ती” वस्तू रेल्वे स्टेशनच्या बाहेर नेली आहे. वस्तूची कसून तपासणी चालू असून त्यातून कोणत्याही निष्कर्षाची अधिकृत माहिती मिळाली नाही.
ताजी बातमी: आताच अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती वस्तू स्फोटके नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी आता घाबरण्याचे कारण नाही. प्रवाशांनी आपला प्रवास निर्धास्तपणे पूर्ण करावा.