
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
हिवरे कोरडा ता. पारनेर :-येथील लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत राममा-२२२ ते मांजरधाव, सोनांबी ते प्रजिमा-५० रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे (ग्रामा -४१) १५ लक्ष व राममा-२२२ ते मांजरधाव हिवरे कोरडा, सोनांबी ते प्रजिमा-५० रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे (ग्रामा-४१) १५ लक्ष आशा ३० लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व शिवसेनेचे नवनिर्वाचित सोसायटी संचालक भास्कर अडसूळ, सचिन कोरडे, ज्ञानदेव आडसूळ, सर्जेराव घंगाळे, कल्पना ज-हड, सुनिता ज-हड यांचा नागरी सत्कार जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते तर प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, माजी पं. स. सदस्य शंकर नगरे,पं.स.सदस्य ताराबाई चौधरी, पाडळी सरपंच हरीश काका दावभट,उद्योजक पोपट चौधरी, पारनेर चे नगरसेवक नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, ॠषी गंधाडे, भाजपचे सुभाष दुधाडे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष सासवडे, पिंपळगाव रोठा तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शिवसेना शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन शाखेचे नूतनीकरण करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले आम्ही काम करणारे आहोत आम्ही कधी खोटे बोलत नाही.आपली राहिलेली सर्व कामे मी आपणास करून देईल काळजी करू नका.ढवळपुरी गटात जो कोणी शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुक लढविल त्यास आपल्या गावातून आघाडी द्या.निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत आपली पन्नास टक्के कामे मार्गी लावून देईल अशी ग्वाही यावेळी सभापती दाते यांनी दिली.मी बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम केलेले आहे जिल्हा परिषद मध्ये माझ्या कामाचा दबदबा व अनुभव मोठा आहे त्यामुळे कामाची काळजी करू नका. मी अभिमानाने सांगेन बांधकाम समितीचे सभापती झाल्यानंतर या तालुक्यात सर्वात जास्त मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तान व स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.आपण सुरुवातीच्या दोन वर्षापूर्वी आले असतात तर आपलेही गावात जवळपास एक कोटी रुपयांची विकासकामे केली असती, परंतु असुद्या या पुढील काळात त्याची भर नक्कीच काढून देईल.तसेच या गावात तीस वर्षानंतर सोसायटीमध्ये सत्ता बरोबरी तुम्ही आणली तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो.तुम्ही आम्हाला उद्घाटनाला बोलवले कार्यक्रम खूप छान आयोजित केला.निवडून आलेल्या संचालक व शिवसेना शाखेचे पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो.असेच संपर्कात राहा, विकासकामे आम्हाला सांगा ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू असे आश्वासन सभापती दाते यांनी दिले.
आपले मनोगत व्यक्त करताना युवा नेते सचिन कोरडे म्हणाले, शंभर फुटांच्या वाळवंटा पेक्षा दहा फुटांची गुलाबाची बाग सुंदर दिसते, आदर्शाचे अमृत आपल्या सारख्यांच्या हृदयात बसून गावकऱ्यांच्या अंतकरणावर अभिष्ठाण करणारे हे कार्य द्रोणाचार्य प्रमाणे पार पाडणारे माननीय दाते सर, यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच येथे प्रगती करणार आहोत. निवडणुकीच्या अगोदर आमचे वाक्य होते आता कसं.. जनता म्हणाल तसं.. आता जनता बोलतेय तीस वर्षानंतर आम्ही सहा संचालक सोसायटीत निवडून आणले यापुढील काळात दाते सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही सचिन कोरडे यांनी दिली.
[ तुम्ही दोन वर्षांपूर्वी दाते सरांकडे आले असते तर कमीत कमी एक कोटी रुपयांची विकासकामे झालेली असते परंतु तुम्हाला पाच कोटींच्या गाजराची वाट पाहत होते तो निधी आला की नाही माहित नाही त्यातली किती कामे चालू आहे तुम्हालाच माहिती, पण जसं तुमचं आहे तसं संपूर्ण तालुक्यात आहे, आम्ही फुगारे सांगणारे नाही. स्वातंत्र्यापासून गावात काम नाही सांगायचे, फक्त पाट्या लावायची, कुठे काम चालू नाही, अशी पद्धतीची कामे आमच्या शिवसेनेच्या टीमची नाहीत सरांनी तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे उद्घाटन केली ते कामही चालू झाले : गणेश शेळके, सभापती पंचायत समिती पारनेर]
यावेळी युवा नेते सचिन कोरडे, शिवाभाऊ दळवी, रामदास गोळे, भास्कर अडसूळ, शाखाप्रमुख संदीप कोरडे, शकील भाई शेख, संतोष अडसूळ, नामदेव अडसूळ, ज्ञानदेव अडसूळ, संतोष ज-हड, सर्जेराव घंगाळे, नाथा ठाणगे, सुदाम कुटे, संभाजी राजे अडसुळ, बबन वाळुंज, अक्षय अडसूळ, भाऊसाहेब अडसूळ, संदीप अडसुळ, हरिभाऊ अडसूळ, संजय अडसूळ, सखाराम कोरडे, अनिल घंगाळे, ग्राम. सदस्य मंगलताई अडसूळ, ज्योती घंगाळे, अनिता दळवी, सुनिता ज-हड, भाऊसाहेब ज-हड, शशी दादा अडसूळ, उस्मान शेख, सुनील अडसूळ, अविनाश अडसुळ, राहुल आडसूळ, नितीन नरसाळे, सचिन ज-हड, युसुफ पठाण, बबन दादा अडसूळ, संजय कुटे, संजय ज-हड, गणेश ज-हड, विनायक ज-हड, महेश ज-हड, आप्पा कोरडे,भास्कर कावरे कामाचे ठेकेदार फारुख सय्यद, नागेश रोहोकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंग गुंजाळ यांनी केले तर आभार सचिन कोरडे यांनी मानले.