
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
———————————————–
आ. बालाजी कल्याणकर यांचे जेष्ठ शिवसैनिकांनी मानले आभार
————————————————————-
नांदेड – ज्वलंत विचाराचा जीवनपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा एक शो नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या वतीने आरक्षीत करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक चित्रपट पाहत असताना, सर्व शिवसैनिकांचे डोळे पाणावले होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांनी हा चित्रपट दाखवल्यामुळे, नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारख्या लोकप्रिय लोकनेत्याचा धगधगत्या अग्निकुंडातला जीवन प्रवास या चित्रपटात दाखवन्यात आला आहे. ज्वलंत विचारांचा जीवनपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वजण आवर्जून पाहत आहेत. प्रत्येक नेते कार्यकर्ते आपल्या जवळील नातेवाईकांना चित्रपट दाखवत आहेत. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी देखील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट शिवसैनिकांना दाखवला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक चित्रपट गृहाबाहेर जमा झाले होते. चित्रपट पाहत असताना सर्व शिवसैनिक गहिवरल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांचे ज्येष्ठ शिवसैनिकांकडून आभार मानण्यात आले आहेत.
——-
आ. बालाजी कल्याणकर
शिवसैनिकांनीच नव्हे तर हा चित्रपट समाजातील सर्वांनीच पाहिला पाहिजे. या चित्रपटातून प्रत्येकाला वेगवेगळ्या बाबी शिकायला मिळतात. त्यामुळेच मी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां साठी एक शो आरक्षीत केला होता. हा चित्रपट म्हणजे ज्वलंत विचारांचा जीवनपट असून एका लोकप्रिय लोक नेत्याचा हा धगधगता अग्निकुंडातला जीवन प्रवास सर्वांनाच प्रभावित करत आहे.