
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री, रमेश राठोड
========================
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील पाणीटंचाई तीव्र निर्माण झाली आहे परिसरातील काही गावांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. उन्हाळा आणि पाणीटंचाई हे जुनेचं समीकरण आहे, त्यांवर प्रशासन दरवर्षी तात्पुरता दरवर्षी योजनांची सोपस्कार पार पडत आहे. त्यासाठी लाखो रुपयांची खर्च केला जातो. अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही .
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणी टंचाई समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणी टंचाई तीव्र होत आहे टँकरची मागणी वाढली आहे टँकरग्रस्त गावात विहीर अतिग्रमण केले जात आहे. मात्र काय मस्नसरुपी व निरंतर पाणीटंचाई त्यांच्या गंभीर समस्यांची दखल शासन कधी घेणार.
याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तहान लागली की विहीर खोदायची हा प्रकार नेहमीच झाला आहे, परिणामी सावळी सदोबा अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यंदाही परिसरातील सुधाकर नगर (चौफुली) पाळोदी , जल्लांधरी, माळेगाव, निळेगाव , सावळी सदोबा येथील ठिकाणी पाण्याची कुठल्याही त्यांच्या निर्णय झाला नाही. अनेक गावे टँकरवर अवलंबून आहे मागील अनेक वर्षापासून या गावांना पाणीटंचाई लागतात टँकर वर तहान भागवावी लागत आहे अशी अनेक गावे शासन विभागाने लक्ष केंद्रित करावे काही गावातील लोकांचे लक्ष वेधले आहे