
उद्याचा दिवस…
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा कहर बघायला मिळतोय. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले. हेच नाही तर अजूनही अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे. पूरस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी नुकसानचे पंचनामे सुरू केली आहेत. हेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात सर्व यंत्रणा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलीये. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचे विरोधक म्हणत आहेत. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळतोय. सतत पाऊस सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केलंय.
राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, मराठवाड्यात एकाच दिवसात 113 टक्के पावसाची नोंद झालीये. काही ठिकाणी जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. मी जिलहाधिकाऱ्यांना सांगून जणावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था केली आहे. आपण अगोदरच 2 हजार कोटी रिलीज केले आहेत. त्याचे वाटप देखील सुरू केले आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, तिथे 10 हजारांची मदत देखील आपण सुरू केली आहे.
ठिकठिकाणी लोकांना राशनच्या किड वाटप देखील सुरू आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्य काम करत आहे की, नाही हे बघा. तुम्ही पण बाहेर रहा. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. कुठे पाणी शिरू शकते, याचा अंदाज घेऊन पहिले या लोकांना बाहेर काढा. देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.
नुकसानग्रस्तांना तातडीची मदत केली जात आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अधिक सर्तकेचा आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि कमी हानी होईल अशाप्रकारची व्यवस्था केली जातंय. सरकार जास्तीत-जास्त मदत लोकांना कशी पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.,