
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड:सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील वांजोळा फाट्यालगत ट्रॅक्टर वअॅपे रिक्षाच्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड येथून नवीन नोंदणी न झालेले (विना पासिंग) ट्रॅक्टर वांगी गावाकडे जात होते. भराडी येथून सिल्लोडकडे येत असलेल्या अॅपे रिक्षा (क्र. एम. एच-१२. बीडी-३१६३) जात असताना एका वळणावर या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये ॲपे रिक्षातील शेख शहाना शेख वसीम, शेख सोफियान शेख वसीम, शेख वसीम शेख मोहम्मद (तिघे रा. जळगाव) तर कृष्णा शिवाजी साळवे (रा. वांगी बु.) हे जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने मदत करीत सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.