
मोठी खळबळ; थेट पुतिन…
संयुक्त राष्ट्र महासभा अमेरिकेत पार पडलीये. मात्र, ही सभा जरी अमेरिकेत असली तरीही भारत आणि रशियाचा यावेळी जलवा बघायला मिळाला. दोन्ही देशांनी एकमेकांचे तोंडभरून काैतुक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत.
मात्र, तरीही रशिया आणि भारतातील संबंध मजबूत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली असून अमेरिकेच्या दबावाला भीक घातली नाही. आता परत एकदा संयुक्त राष्ट्र महासभेत भारत आणि रशियाची मैत्री बघायला मिळाली. हेच नाही तर सध्याच्या टॅरिफच्या तणावात व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर डिसेंबर महिन्यात येण्यााची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रात बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, डिसेंबर महिन्यात व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर जाण्याचे नियोजन करत आहेत. पुढे लावरोव यांनी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये व्यापक द्विपक्षीय अजेंडा आहे. रशिया आणि भारतामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये व्यापार करार आहेत. यासोबतच एससीओ आणि ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोन्ही देशांमध्ये समन्वय आहे.
भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनीही भाषणात म्हटले की, भारतामध्येही तुर्कीसारखा आत्मसन्मान आहे. यावेळी त्यांनी म्हटले, भारत हा रशियासोबतच्या व्यापारामध्ये स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत आणि रशियातील आर्थिक संबंध अजिबात धोक्यात नाहीत, भलेही अमेरिकाने भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्यामुळे टॅरिफ लावले असले तरीही.
आता हे स्पष्ट झाले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चीनमध्ये भेट झाली. हेच नाही तर दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकाच गाडीमधून प्रवास देखील केला. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून संवाद साधला होता. अमेरिका भारतावर दबाव टाकत असताना रशिया आणि भारतातील जवळीकता अधिक वाढली आहे.