
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी- सुशिल वडोदे
सिल्लोड :घाटनांद्रा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत भाजपा पुरस्कृत जय जवान जय किसान या पॅनेलने बाजी मारत सर्व १३ जागा जिंकत शिवसेना पुरस्कृत शिवशाही पॅनेलचा पराभव केला. या सोसायटीसाठी मतदान व त्यानंतर मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना पुरस्कृत पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. यात माजी सरपंच पुंडलीकराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र पाटील मोरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा मोरे माजी उपसरपंच शफी शेख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने बाजी मारली. विजयी उमेदवारांमध्ये विठ्ठल किसन नागरे, पुंडलिक पांडुरंग मोरे, मोरे बापू, रामचंद्र मोरे कैलास सोनाजी मोरे, शिवाजी गोविंदा, शेख अनिस शेख गणी, पठाण लियाकत खाँ अकबर खाँ, मोरे छायाबाई काकासाहेब मोरे यशोदाबाई पंडित, तडवी पिरखाँ गुलाब, केवट सुखदेव, आनंदा जाधव, कुशीवरताबाई एकनाथ या विजयी उमेदवारांचा समावेश आहे यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा ग्रामपंचायत सदस्य इमरान पठाण, माजिद पठाण, बाबा पटेल, गुड्डू चाऊस, राजधर मोरे, बाजीराव मोरे, रघुनाथ मोरे, दिगंबर मोरे, मंजीतराव मोरे, कारभारी भिका मोरे, उल्हास देशपांडे, शिवनाथ बावस्कर, गोपाल गवरे, सुनील ज्ञाने, गोपाल नागरे, योगेश मोरे, माणिक मोरे, विनायक मोरे, बाळू बावसकर, सचिन जयस्वाल, पाशा पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.