
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
खामगाव:भोटा ते खामगाव बससे वा दि. १८ मे रोजी सुरू करण्यात आलेली आहे. खामगाव ते भोटा बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी दि. ०६ मे २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. भोटा येथे पंचक्रोशीतील हिंगणा इसापूर, दादगांव, रोटी, हिंगणा दादगांव, हिंगणा भोटा आदी गावातील प्रवाशी भोटा येथून खामगाव-शेगांवला दररोज प्रवास करित असतात. परंतु कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे व अलिकडेच एस टी कर्मचारी यांच्या संपामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील बसेस बंद होत्या, त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत होते. बंद असलेल्या बसमूळे प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत होता. परंतु खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत होते. परंतु या भागातील नागरिकांना खामगाव येथे जाण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता मनसे राज्य उपाध्यक्ष श्री विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे,मनसेचे खामगाव शहर अध्यक्ष आनंद गायगोळ,आकाश पाटील आदी सहकाऱ्यांना सोबत घेत खामगाव आगार प्रमुख यांना बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. खामगाव वरुन भोटा येथे येणारी ही बस पहुरजीरा, जलंब, माटरगांव, भास्तन, कठोरा मार्गे भोटा येथे सकाळी १०:३० वाजता पोहचली असता मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांच्या वतीने चालक एस एस खांदेले व वाहक एम एस जैस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एस टी महामंडाळाचे गावकर्यांनी आभार मानले.
यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, गावचे सरपंच प्रविण कोकाटे, उपसरपंच तेजराव भोटकर, रा. काॅ. नांदुरा ता.उपाध्यक्ष गजानन रा. पारस्कर, बाळूभाऊ पाटील, भागवत पारस्कर, योगेश मानकर, श्री मेडिकलचे ज्ञानेश अंदुरे, प्रकाश पारस्कर, अविनाश पारस्कर, चेतन पारस्कर, काशिनाथ घुळे, विष्णू भोटकर, शंकर पारस्कर, विष्णू पारस्कर, मंगेश पारस्कर यासह आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.