
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
नागपूर:- नागपूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने ‘विदर्भ लेवल स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धा दि.१४ व दि.१५ मे रोजी घेण्यात आली होती.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील मुले आली होती.या स्पर्धेत यशराज गणेशराव बिरादार हा सर्व मुलांमधून प्रथम आला आहे.
त्याबद्दल त्याचे वडील गणेशराव बिरादार (डी.वाय.एस.पी.नागपूर) व आई प्रतिभा बिरादार, अॅड.विनायकराव पा.कदम, गणेश कदम,संगम कदम यांच्याकडून यशराज ह्यास अभिनंदन व पुढे अश्याच प्रकारे यश मिळवित राहो अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.